अर्णव गोस्वामी हक्कभंग: राज्य सरकार वकिलांना प्रति सुनावणी साडेबारा लाख रुपये फी देणार
 

रिपब्लिक माध्यम समूहाचे अर्णव गोस्वामी यांच्याविरुद्ध मागच्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव आणला गेला होता. त्याविरुद्ध गोस्वामी ह्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत राज्याची बाजू मांडण्यासाठी अभिषेक मनु सिंघवी ह्या ज्येष्ठ वकिलांना प्रति सुनावणी १२,५०,००० रुपये फी देण्याच्या निर्णयाला आज मान्यता देण्यात आली.

 

मागील वर्षी पालघर साधू हत्याकांड प्रकरणाचे वार्तांकन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल शिवसेना नेते प्रताप सरनाईक ह्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात अर्णव गोस्वामी यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणला होता.

 

ह्या हक्कभंग प्रस्तवाविरुद्ध अर्णव गोस्वामी ह्यांनी सर्वोच्च न्यायालयात दिवाणी रीट याचिका दाखल केली होती. ह्या याचिकेत क्रमांक ४ चे प्रतिवादी म्हणून महाराष्ट्र राज्याला गृह सचिवांमार्फत पक्ष करण्यात आले होते.

 

ह्याच याचिकेत राज्य सरकारची बाजू मांडण्यासाठी सरकारकडून काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी ह्यांची नेमणूक करण्यात आली होती.

 

आज जारी केलेल्या शासननिर्णयानुसार अभिषेक मनु सिंघवी ह्यांना ह्या प्रकरणात प्रति सुनावणी म्हणजेच सुनावणीच्या प्रत्येक दिवशी उपस्थितीसाठी १२,५०,००० रुपये एवढी फी देण्याला मान्यता देण्यात आली आहे.

  Maharashtra GR  

राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर असताना मुख्यमंत्री केवळ आपल्या प्रतिष्ठेसाठी राज्याच्या वकीलांवर एवढी मोठी रक्कम खर्च करत आहेत हे संतापजनक असल्याचे मत अनेकांनी समाज माध्यामांवरून व्यक्त केले आहे.

   

2 thoughts on “अर्णव गोस्वामी हक्कभंग: राज्य सरकार वकिलांना प्रति सुनावणी साडेबारा लाख रुपये फी देणार

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!