सर्वोच्च न्यायालयाचे सर्व्हर डाउन: देशातील कोरोना व्यवस्थापनावरील सुनावणी पुढे ढकलली
 

सर्वोच्च न्यायालयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणाऱ्या सुनावणीला आज तांत्रिक बिघाडामुळे फटका बसला. सर्व्हर डाउन झाल्याने देशातल्या कोरोना व्यवस्थापनावर सुरू असलेली सुनावणी न्यायालयाने गुरुवार वर ढकलली आहे.

 

न्या. चंद्रचूड, न्या. नागेश्वर राव, न्या. रवींद्र भट ह्यांच्या खंडपीठासमोर आज कोरोना व्यवस्थापन, आवश्यक वस्तू सेवांचे वितरण ह्यावरील suo motu याचिकेवर सुनावणी होणार होती. कोर्टाने ही याचिका suo moto म्हणजे आपणहून दाखल करून घेतलेली आहे. मागील सुनावणीत कोर्टाने केंद्र सरकारला लसीकरण धोरणावरून प्रश्न केले होते.

 

सकाळी सुनावणी सुरू झाली. केंद्राने आपले प्रतिज्ञापत्र दाखल केले असल्याचे सांगितले. पण लगेचच तांत्रिक बिघाडामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये अडथळे यायला लागले. बराच वेळ वाट बघितल्यानंतर अखेर कोर्टाचे सर्व्हर डाउन झाल्याचे समजले आणि न्या. भट ह्यांनी सुनावणी गुरुवारी घेतली जाईल असे सांगितले.

 

इतर यकाहिकांवरील सूनवणीही आज होऊ शकणार नसल्याचे समजते.

मागच्या वर्षी कोरोना महामारीमुळे टाळेबंदी झाली आणि सर्वोच्च न्यायालयाने आभासी पद्धतीने कामकाज सुरू केले. वर्षभरानंतरही ह्या आभासी सूनवण्यांमध्ये तांत्रिक बिघाडामुळे असे व्यत्यय येत आहेत.

अनेक कनिष्ठ न्यायालयांमध्ये तर  सुनावणीची तरतूदच होऊ शकलेली नाही.

One thought on “सर्वोच्च न्यायालयाचे सर्व्हर डाउन: देशातील कोरोना व्यवस्थापनावरील सुनावणी पुढे ढकलली

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!