महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ह्यांच्या जालना जिल्ह्यात नेमून दिलेल्या संख्येपेक्षा अतिरिक्त लसी मिळाल्याच्या अरोपांवषयी अहवाल सादर करण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून महाराष्ट्र सरकारला देण्यात आले आहेत.
अतिरिक्त सचिव विकास शील ह्यांनी एक पत्र लिहून राज्य सरकारकडे हा अहवाल मागितला आहे.
दैनिक इंडियन एक्स्प्रेस मधील ५ मे रोजीच्या बातमीचा ह्या पत्रात उल्लेख आहे. ह्या बातमीत जालना जिल्ह्यात कोरोना लसींच्या नेमून दिलेल्या वाटपापेक्षा जास्त लसी देण्यात आल्याचा दावा केलेला आहे.
तसेच COWIN ॲप वरील आकडेवारीचाही ह्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार जानेवारी २०२१ मध्ये जालन्यात लसीचे ४७९४, फेब्रुवारी महिन्यात १२,०१६, मार्च महिन्यात ५३,०८५ तर एप्रिल महिन्यात तब्बल १,३४,२९० लसीचे डोस दिले गेले आहेत.

ह्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तथ्य पडताळून अहवाल सादर करावा असे निर्देश केंद्र सरकारकडून ह्या पत्राद्वारे देण्यात आले आहेत.