संगमनेर शहरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर गुन्हे दाखल
 

महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात पोलिसांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू असताना काल ( गुरुवारी ) संगमनेर शहरात एक संतापजनक घटना घडली.  शहरातील मोगलपुरा परिसरात अल्पसंख्यांक समाजातील लोक मोठ्या संख्येने एकत्र आले होते. त्यांच्यातील अनेकांनी मास्क लावलेले नव्हते आणि सामाजिक अंतरही पाळले जात नव्हते. पोलिसांनी ही गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला असता जमावाने पोलिसांवरच हल्ला केला. पोलिसांची संख्या कमी असल्याने त्याने तिथून पळ काढावा लागला. ह्या हल्ल्यात पोलीस जखमीही झाले. पोलिसांनी देखरेखीसाठी उभारलेला एक तंबुही जमावाने पडून टाकला.

 

ह्या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडिया वर प्रसृत झाल्यावर राज्यभरातून निषेध व्यक्त होऊ लागला.

   

पोलिसांनी लगेचच ह्या जमावातील जुबेर हॉटेलवाला, निसार खिचडीवाला, झाकीर खान, अरबाज साजिद शेख, मोहम्मद हनीफ रशीद शेख व अन्य अनोळखी व्यक्तींवर गुन्हे दाखल केले.

  FIR against people attacking police in Sangamner  

भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली बेकायदेशीर जमावाचा भाग असणे, दंगल माजवणे, सरकारी कामात अडथळा आणणे, इ गुन्हे दाखल केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!