न्या. अंबादास जोशी ह्यांची गोव्याच्या लोकायुक्त पदी नियुक्ती
 

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी ह्यांची आज ( शुक्रवारी) गोव्याच्या लोकायुक्त पदी नियुक्ती झाली.

 

 सकाळी गोव्याच्या राजभवनात शपथविधी पार पडला. महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंह कोष्यारी ह्यांनी दूरस्थ माध्यमातून न्या. जोशी ह्यांना शपथ दिली. ह्या सोहळ्याला गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते.

   

न्या. अंबादास जोशी ह्यांची २००९ साली मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांची Maharashtra Administrative Tribunal च्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. २०१९ साली ते ह्या पदावरून निवृत्त झाले.

 

न्या. जोशी यांनी आता गोव्याच्या लोकायुक्त पदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!