बंगाल हिंसाचार: कलकत्ता उच्च न्यायालयाने मागितला अहवाल
 

कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगालच्या सरकारकडे निवडणुकीनंतर उसळलेल्या हिंसाचाराबाबत अहवाल मागितला आहे.

 

२ मे रोजी बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात प्रचंड हिंसाचार उसळल्याचे समोर आले. सोशल मीडिया वर हिंसाचाराच्या घटनांचे फोटो, व्हिडिओ पुढे आले. त्यानंतर देशभरातून ह्या हिंसाचाराचा निषेध होऊ लागला.

आनिंद्य सुंदर दास ह्या वकिलाने कलकत्ता उच्च न्यायालयात याचिका दाखल करत हा हिंसाचार थांबवण्यासाठी पोलिसांनी कार्यवाही करावी, केंद्राने केंद्रीय सुरक्षा दलाला पाठवावे अशा मागण्या केल्या.

 

याचिकाकर्त्याचे म्हणणे काय ?

 विजयी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इतर पक्षाच्या कार्यकर्त्या, मतदारांना मारहाण केली, घरे, कार्यालये जाळली. बंगालमध्ये पूर्वीही निवडणुकीनंतर हिंसा होत होती परंतु प्रशासन लगेच कार्यवाही करत असे पण ह्यावेळी तसे होताना दिसत नाही. एका पक्षाचे कार्यकर्ते धर्माच्या नावाखाली हिंसा करत आहेत. कित्येकांना आपली राहतो घरे, गावे सोडावी लागत आहेत.

 

ही याचिका आज उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी आली असता न्यायालयाने बंगाल सरकारकडून तातडीने हिंसेच्या घटनांवर अहवाल मागवला आहे. १० मे ला पुढील सुनावणी असून त्यापूर्वी हा अहवाल राज्याच्या गृह सचिवांनी न्यायालयासमोर सादर करायचा आहे. हिंसाचाराच्या घटना कोणकोणत्या ठिकाणी घडल्या, त्यावर काय कार्यवाही करण्यात आली असा सगळा तपशील न्यायालयाने मागितला आहे.

 

सर्वोच्च न्यायालयात बंगाल हिंसाचाराबाब दोन याचिका दाखाल झालेल्या आहेत.

 

हे वाचले का?

   

बंगाल हिंसा: महिला कार्यकर्त्यांवरील अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

बंगाल हिंसाचाराची सीबीआय चौकशी व्हावी: सुप्रीम कोर्टात याचिका

बंगाल हिंसाचाराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल

 

बंगाल हिंसाचारावर घटनात्मक उपाय ह्या विषयावरील साई दीपक जे. ह्यांनी हे LawMarathi च्या फेसबूक पेज वरून साधलेला संवाद

   

error: Content is protected !!