मनसुख हिरेन हत्याकांड आणि Antilia स्फोटक प्रकरणात अटकेत असलेल्या निलंबित पोलिस सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे ह्याला आता कोठडीत टीशर्ट, जीन्स मिळणार आहे.
मुंबईतील विशेष NIA न्यायालयाने सचिन वाझेची न्यायालयीन कोठडी १९ मे पर्यंत वाढवली. ह्यावेळी त्याने काही खाजगी वस्तू मिळाव्यात ह्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने स्वीकारला. वाझेने टीशर्ट, जीन्स, स्पोर्ट्स शूज, मीठ, साखर, मीठ साखरेच्या बरण्या, चष्मा, कपडे धुण्याची साबण पावडर, आंघोळीचा साबण आणि औषधे ह्या वस्तूंची मागणी केली होती.
तळोजा कारागृहात असलेल्या वाझे ह्याला ह्या वस्तू पुरवण्याचे निर्देश न्यायालयाने कारागृह अधीक्षकांना दिले आहेत. ह्या वस्तू वाझेच्या कुटुंब किंवा वकिलाने आणून द्यायच्या आहेत. त्याला द्यायची औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन नुसारच असावी असेही न्यायालयाने सांगितले आहे.
हे ही वाचा
मला सुरक्षित ठिकाणी ठेवा: सचिन वाझेची कोर्टाला मागणी