सुनैना होले यांच्यावरील गुन्हा रद्द: राज्य सरकारला दणका

मुंबई: नागपूरच्या सुनैना होले यांच्या ट्विटविरोधात दाखल केलेला गुन्हा रद्द करून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दणका दिला आहे.

 

सुनैना होले यांच्याविरोधात १५ एप्रिल २०२० रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनैना होले यांनी केलेल्या ट्विटमुळे समाजात धार्मिक-जातीय तेढ निर्माण झाली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. १४ एप्रिल रोजी बांद्रा स्थानकाबाहेर जमलेल्या प्रवासी लोंढ्यांबद्दल ही ट्विट होती.

 

त्यांच्याविरुद्ध IPC कलम 1५३A खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

सुनैना होले यांनी CrPC कलम 482 नुसार मुंबई उच्च न्यायालयात गुन्हा रद्द करण्याची विनंती करणारा अर्ज मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता.  त्यांची मागणी उच्च न्यायालयाने मान्य करून पोलिसांना गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

 

तसेच सुनैना होले यांनी सोशल मीडियावर प्रसारित केलेल्या मजकुरावरून कोणत्याही स्वरूपाची धार्मिक-जातीय तेढ निर्माण होत नाही, असे न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

 

तसेच सूनैना ह्यांचा सामाजिक, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हेतू होता असेही त्यांच्या ट्विट मधून दिसत नसल्याचे कोर्टाने नोंदवले.

 

अभिनव चंद्रचूड ह्यांनी सुनैना ह्यांची बाजू मांडताना काही महत्त्वाच्या निकालांचे दाखले दिले.  ह्यापैकी एक निकाल जोसेफ डिसूझा वि. महाराष्ट्र. ह्या निकालात न्यायालयासमोर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील काही भडक लेख होते. चंद्रचूड ह्यांनी त्या लेखांचा दाखला देत त्या लेखांशी तुलना करता सूनेना ह्यांची ट्विट अगदीच निरुपद्रवी असल्याचा  युक्तिवाद केला.

त्यांनी मंझर सईद खान वि. महाराष्ट्र ह्या निकालाचा आधार घेत १५३A मधील अव्यवस्था मजवण्याचा हेतू ओळखण्याचे निकष कोर्टापुढे मांडले. कोणत्या परिस्थितीत आणि काय विधान केले जाते ह्यावरून आरोपीचा हेतू ठरवावा असे ह्या निकालाने प्रस्थापित तत्व होले ह्यांच्या बाजूने न्यायालयापुढे मांडण्यात आले.

 

होले ह्यांचा लोकांना भडकवण्याचा किंवा अव्यवस्था माजवण्याचा हेतू नसल्याचा युक्तिवाद न्यायालयाला पटला. न्यायालयाने त्यांच्यावरील FIR रद्दबातल ठरवली.

महाराष्ट्र सरकारवर टीका करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे सत्र राज्य सरकारने गेल्या वर्षभरात चालवले होते. त्यात सूनैना ह्यांच्यावर आणखी तीन गुन्हे दाखल आहेत.

हा निर्णय सोशल मीडिया वर व्यक्त होणाऱ्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. अशा इतरांच्या खटल्यावरही हा निकाल परिणाम साधू शकतो.

 

उच्च न्यायालयाचे न्या. कर्णिक आणि न्या. शिंदे यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणी झाली. ५ मे रोजी हा मुंबई उच्च न्यायालयाच्या वतीने आदेश देण्यात आला आहे.

 

हे वाचले का?

 

ठाकरे विरोधी ट्विट करणाऱ्या सूनैना होलेंना हाय कोर्टाचे संरक्षण

   

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!