बंगाल हिंसाचाराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल
 

पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराची गंभीर दखल आज राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली आहे.

 

आयोगाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसर ४ मे रोजी विविध वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारे पश्चिम बंगाल मध्ये राजकीय हिंसाचार उसळून मारहाण, जाळपोळ, हत्या अशा घटना घडल्याचे समोर आले. ह्या घटना म्हणजे निरपराध नागरिकांच्या जगण्याच्या हक्कावर आघात आहे. आणि म्हणूनच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने स्वतःहून ( suo moto) दखल घेतली आहे.

 

आयोगाच्या तपास विभागाची एक फॅक्ट फाइंडिंग समिती बंगाल मध्ये जाऊन तातडीने ह्या हिंसाचाराच्या घटनांवर आपला अहवाल तयार करेल आणि त्यानुसार आयोग पुढील कार्यवाही करेल.

 

हे ही वाचा

 

बंगाल हिंसाचाराची सीबीआय चौकशी व्हावी: सुप्रीम कोर्टात याचिका

बंगाल हिंसा: महिला कार्यकर्त्यांवरील अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल

 

बंगालमधील राजकीय हिंसा थांबवायला केंद्रीय सुरक्षा दलांना पाठवा: सुप्रीम कोर्टात याचिका

   

One thought on “बंगाल हिंसाचाराची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून गंभीर दखल

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!