मराठा आरक्षणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात निकाल
 

महाराष्ट्र सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. ह्या प्रकरणाचा निकाल उद्या ( ५ एप्रिल) जाहीर होणार आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ह्या प्रकरणाची सविस्तर सुनावणी झाली होती. एखाद्या राज्यात ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येते का ह्या घटनात्मक मुद्द्यावर सर्व पक्षांकडून युक्तिवाद करण्यात आला होता.

सुनावणी पूर्ण झाल्यावर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. उद्या तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणाऱ्या सुनावणीत जाहीर करण्यात येणार आहे.

 

ह्या घटनापिठावर ( constitution bench) न्या. अशोक भूषण, न्या. अब्दुल नझिर, न्या.नागेश्वर राव, न्या. हेमंत गुप्ता, न्या. रवींद्र भट हे न्यायमूर्ती होते.

     

दरम्यान राज्यातील मराठा आरक्षणावर स्थगिती होती. उद्या सर्वोच्च न्यायालय ह्या प्रकरणात काय निकाल देते ह्यावर इतरही अनेक राज्यातील आरक्षणाचे धोरण अवलंबून असणार आहे.

 

हा निकाल जाणून घेण्यासाठी LawMarathi ला फॉलो करत रहा.

 

हे ही वाचा

मराठा आरक्षण: सुप्रीम कोर्टात ८ मार्च पासून सुनावणी

मराठा आरक्षण घोळ – एमपीएससी सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेणार.

One thought on “मराठा आरक्षणावर उद्या सर्वोच्च न्यायालयात निकाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!