बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.
२ मे रोजी पश्चिम बंगाल राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. ह्यात तृणमूल काँग्रेस पक्षाचा विजय झाला. ह्यानंतर लगेचच राज्यभर हिंसाचाराच्या घटना घडत असल्याचे समोर येऊ लागले.
विजयी तृणमूल पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना मारहाण करायला सुरुवात केल्याचे आरोप रविवारपासून होऊ लागले. भाजपच्या ६ कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचेही समोर आले. महिला कार्यकर्त्यांवर अत्याचार होताणाचे व्हिडिओ सोशल मीडिया वर समोर आले.
https://www.instagram.com/p/COcOBrjj4Pa/?igshid=1ag5uxyweqr7a
ह्या सर्व घटनांची चौकशी सीबीआय ने करण्याचे निर्देश न्यायालयाने द्यावे अशी मागणी ह्या याचिकेत केली गेली आहे. तसेच पश्चिम बंगाल सरकारने ह्या हिंसाचाराच्या घटनांचा अहवाल सादर करावा अशीही मागणी करण्यात आली आहे.
ही याचिका सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आणि भाजप प्रवक्ते गौरव भाटिया ह्यांनी दाखल केली आहे.
हे ही वाचा
बंगालमधील राजकीय हिंसा थांबवायला केंद्रीय सुरक्षा दलांना पाठवा: सुप्रीम कोर्टात याचिका
बंगाल हिंसा: महिला कार्यकर्त्यांवरील अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल
2 thoughts on “बंगाल हिंसाचाराची सीबीआय चौकशी व्हावी: सुप्रीम कोर्टात याचिका”