आयपीएल विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका
 

इंडियन प्रीमियर लीग ह्या क्रिकेट सामन्यांच्या सत्राविरोधत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे.

 

ह्या वर्षी कोरोनाच्या छायेत आयपीएल सामने होत आहेत. ह्यातच दिल्ली आणि अहमदाबाद येथील बायो बबल मध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने BBCI कडून सर्व सामने मुंबईत हलवण्याचा विचार होत आहे.

 

देशात आणि महाराष्ट्रात कोरोना महामारीची परिस्थिती गंभीर असताना मुंबईत आयपीएल चे सामने खेळवले जाऊ नयेत, त्यासाठी सर्व यंत्रणा वापरली जाऊ नये अशी मागणी याचिका करण्यात आली आहे.

 

आयपीएल पुढे ढकलण्यात यावी किंवा रद्द करावी अशीही मागणी याचिकेत करण्यात आली आहे. आयपीएल साठी वापरली जाणारी सर्व संसाधने कोरोनाचा सामना करण्यासाठी वापरता येऊ शकतील आणि तेच करणे गरजेचे आहे. आयपीएल सामने ही अत्यावश्यक सेवा नाही असेही याचिकाकर्त्यांनी म्हंटले आहे.

 

ह्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!