अनिल देशमुख पुन्हा एकदा उच्च न्यायालयात: एफआयआर ला आव्हान
 

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख ह्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सीबीआय ह्या केंद्रीय तपास यंत्रणेने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआरआय ला आव्हान देणारी ही याचिका आहे.

 

मनसुख हिरेन हत्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात खंडणी वसुलीचे प्रकरण गाजले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंह ह्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिस अधिकाऱ्यांमार्फत खंडणी गोळा करत असल्याचे आरोप केले होते. ह्याच प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय कडे चौकशी सोपवली होती.

 

सीबीआय ने प्राथमिक चौकशी नंतर अनिल देशमुख यांच्याविरुद्ध FIR दाखल केली होती. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहिता ह्यातील कलमांखाली देशमुख ह्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 

हीच FIR रद्द करावी ह्या मागणीसाठी देशमुखांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच याचिकेची सुनावणी पूर्ण होईपर्यंत सीबीआयच्या कारवाई पासून अंतरिम संरक्षण मिळावे अशीही मागणी केली आहे.

 

हे ही वाचा

देशमुख प्रकरण: सीबीआयच्या FIR मध्ये लिहिलंय काय?

One thought on “अनिल देशमुख पुन्हा एकदा उच्च न्यायालयात: एफआयआर ला आव्हान

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!