पश्चिम बंगाल राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रचंड हिंसा उसळल्याचे समोर आले. निवडणुकीत विजयी झालेल्या ममता बॅनर्जी ह्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हा हिंसाचार करत असल्याचे आरोप होत आहेत. ह्या हिंसाचारात महिला कार्यकर्त्यांवर अत्याचार झाल्याचेही व्हिडिओ समोर आले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाने ह्यातील एका व्हिडिओ वरून ह्या अत्याचाराच्या घटनेची स्वतःहुन दखल घेतली आहे
भारतीय जनता पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते अत्याचार करत असल्याचे सांगत भाजप नेते कैलास विजयवर्गीय ह्यांनी एक व्हिडिओ share केला होता. हा व्हिडिओ ट्विटर वर इतरही अनेकांनी शेअर केला. ह्या व्हिडिओला retweet करत राष्ट्रीय महिला आयोगाने आपण ह्या घटनेची दाखल घेत असल्याचे सांगितले.
@NCWIndia is taking suo motu cognizance of the incident. The Commission will be taking appropriate action in the matter. https://t.co/a5QKfFJdCB
— NCW (@NCWIndia) May 3, 2021
महिला आयोग ह्या घटनेसंबंधी योग्य तो कार्यवाही करेल असेही आयोगाने आपल्या ट्विटर खात्यावरील सांगितले आहे.
हे वाचले का?
बंगालमधील राजकीय हिंसा थांबवायला केंद्रीय सुरक्षा दलांना पाठवा: सुप्रीम कोर्टात याचिका
3 thoughts on “बंगाल हिंसा: महिला कार्यकर्त्यांवरील अत्याचाराची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल”