पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर प्रचंड हिंसाचार होत असल्याचे समोर आले आहे. हा हिंसाचार थांबवण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दलांना बंगालमध्ये पाठवावे अशी मागणी करणारी याचिका Indic Collective ही संस्था सर्वोच्च न्यायालयात दाखल करत असल्याचे समजते.
Deeply disturbed by the violent aftermath of the elections in West Bengal, we have decided to approach the Supreme Court, asking for central security forces to be deployed to put an end to the political violence.
— Indic Collective (@indiccollective) May 3, 2021
ममता बॅनर्जी ह्यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जिंकली. ह्यानंतर तृणमूल कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचे, कार्यालयांना आग लावल्याचे, तोडफोड केल्याचे आरोप होत होते आणि अशा तथाकथित घटनांचे व्हिडिओ रविवार पासुन समोर येत होते.
भारतीय जनता पक्षाच्या ६ कार्यकर्त्यांची तृणमूल कार्यकर्त्यांनी हत्या केल्याचेही आरोप होत आहेत. ह्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचे समजताच बंगालच्या राज्यपालांनी पोलिसांना योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यांनी गृह सचिवांकडे ह्यासंबंधी अहवालही मागितला.
ACS Home @HomeBengal who was called by me in wake of rising post poll violence in State has been directed to submit report on post poll violence and vandalism in State & steps taken.
— Governor West Bengal Jagdeep Dhankhar (@jdhankhar1) May 3, 2021
He has been urged to take all possible measures to ensure accountability of officials concerned. pic.twitter.com/sudmDapbPp
परंतु राज्यपालांना अजूनही हा अहवाल मिळालेला नसल्याचे समजते .
केंद्रीय गृह मंत्रालयाने बंगाल सरकारकडून निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसक घटनांचा अहवाल मागितला आहे.
MHA has asked West Bengal Government for a report on the post election violence targeting opposition political workers in the state.@HMOIndia @PIB_India @DDNewslive @airnewsalerts @ANI
— Spokesperson, Ministry of Home Affairs (@PIBHomeAffairs) May 3, 2021
भाजप नेते कैलास विजयवर्गीय ह्यांनी बंगालमध्ये चालू असलेल्या हिंसाचाराचा एक व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला आहे. ज्यात महिला कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण होताना दिसते आहे.
TMC Muslim Goons are beating BJP Women Workers in kendamari village, Nandigram#Shamemamatabannerjee #ShameTMC pic.twitter.com/V8eireETm6
— Kailash Vijayvargiya (@KailashOnline) May 3, 2021
परंतु ही हिंसा थांबण्याची चिन्हे दिसत नसल्याने आता Indic Collective ह्या ट्रस्ट ने सर्वोच्च न्यायालयात दाद मागायला जाण्याचा निर्णय घेतला आहे. ही याचिका लवकरच दाखल होऊन त्यावर सुनावणी होईल.
अपडेट ( ४/५/२०२१)
Indic Collective तर्फे मंगळवारी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका संपूर्ण वाचण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा.
https://www.indiccollective.org/court-news/pil-for-deployment-of-central-forces-in-west-bengal/
2 thoughts on “बंगालमधील राजकीय हिंसा थांबवायला केंद्रीय सुरक्षा दलांना पाठवा: सुप्रीम कोर्टात याचिका”