सोराबजी महाधिवक्ता झाले आणि पालखीवालांनी भारताचे अभिनंदन केले…

भारताचे माजी महाधिवक्ता सोली सोराबजी ह्यांचे आज दुखःद निधन झाले. अनेक राजकारणी, वकील, पत्रकार, नागरिकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. काहींनी त्यांच्याबरोबरच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. सोराबजी यांच्याविषयीच्या अशाच एका अठवणीला आपणही उजाळा देऊया...

 

सोली सोराबजी हे महान विधीज्ञ नानी पालखीवाला ह्यांचे शिष्य होते. त्यांचे एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. १९८९ साली जेव्हा सोली ह्यांची भारताचे Attorney General म्हणुन नियुक्ती झाली, तेव्हा पालखीवाला ह्यांनी आपल्या ह्या शिष्याला एक पत्र लिहिले.

पालखीवाला ह्या पत्रात लिहितात,

"प्रिय सोली, मला तुझे महाधिवक्ता पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी हे पत्र लिहायचे होते पण तुझे नियुक्ती झाल्यानंतरचे जाहीर निवेदन वाचून मला आता तुझ्यासारखा महाधिवक्ता ह्या देशाला मिळतोय ह्याबद्दल ह्या देशाचेच अभिनंदन करावेसे वाटते.”

 

असे काय होते सोराबजी ह्यांच्या नियुक्ती नंतरच्या निवेदनात?

सोराबजी म्हणाले होते की, महाधिवक्ता हा जनहिताचा संरक्षक आणि मानवाधिकारांचा पुरस्कर्ता असतो.

 

त्यांचे हेच म्हणणे पालखीवालांना मनापासून पटले आणि म्हणून पालखीवाला आपल्या पत्रात पुढे म्हणतात, " महाधिवक्त्यासाठी सरकारला केस जिंकवून देणे ह्यापेक्षा लोकांना न्याय मिळवून देणे ह्यात सर्वोच्च गौरव असतो.”

 

ह्या पत्रात त्यांनी सोराबजीना अमेरिकेच्या Attorney General च्या कक्षाबहेर लिहिलेले वाक्य सांगितले. ते वाक्य असे,

'The United States wins its case whenever justice is done to one of its citizens in the courts'

म्हणजेच न्यायालयात आपल्या कोणत्याही नागरिकाला न्याय मिळणे हा अमेरिकेचा त्या केस मधला विजय असतो.

 

पुढे पालखीवाला ह्या पत्रात सोराबजींना त्यांच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा देताना असे म्हणाले की सोराबजींची नियुक्ती ही भारतातील सार्वजनिक कायद्याच्या उत्क्रांतीतील नवीन पायरी ठरेल.

 

सोराबजी ह्यांना पालखीवाला ह्यांच्या ह्या गौरवोद्गारांनी किती आनंद झाला असेल ह्याची आपण कल्पनाच करू शकतो.

 
ह्या दोन्ही महान वकिलांना LawMadathi चा सलाम !
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!