ज्येष्ठ विधीज्ञ सोली सोराबजी ह्यांचे निधन
 

ज्येष्ठ विधीज्ञ, भारताचे माजी ॲटर्नी जनरल सोली सोराबजी ह्यांचे आज सकाळी निधन झाले. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ९१ वर्षांचे होते.

 

सोराबजी ह्यांनी विधी क्षेत्रातल्या आपल्या सात दशकांच्या उत्तुंग कारकीर्दीत अनेक महत्त्वाच्या न्यायालयीन लढाया लढल्या. त्यांच्या वकीलील सुरुवात मुंबईत झाली. त्यांनी केशवानंद भारती प्रकरणात  महान कायदेपंडित नानी पालखीवाला ह्यांच्या सहाय्यकाची भूमिका पार पाडली होती.

 

सोराबजी ह्यांना १९७१ साली सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील नियुक्त केले. त्यांनी १९८९-९० आणि पुढे १९९८-२००४ ह्या काळात भारताचे Attorney General पद भूषविले. त्यांना अटलबिहारी वाजपेयी सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले.

 

सोली सोराबजी ह्यांच्या निधनाच्या वार्तेने केवळ विधिविश्र्वच नाही तर संपूर्ण देश हळहळत आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद ह्यांनी आपल्या ट्विटर द्वारे शोक व्यक्त केला.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोराबजी ह्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

भारताचे विधी आणि न्याय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही अत्यंत भावनिक श्रद्धांजली वाहताना सोराबजी यांच्याबरोबरच्या आपल्या व्यक्तिगत स्मृतींना उजाळा दिला.

 

सर्वोच्च न्यायालयातर्फे सरन्यायाधीश रमणा ह्यांनी एक शोकसंदेश जाहीर करत सोराबजी ह्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

 

CJI Ramana pays tribute to Soli sorabji

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी एका ट्विट द्वारे सोराबजी ह्यांना आदरांजली अर्पण केली.

 

अनेक राजकीय नेते, वकील, नागरिकांनी सोली सोराबजी ह्यांनी मानवाधिकार, मूलभूत अधिकार ह्यासाठी दिलेल्या न्यायालयीन लढ्यांना उजाळा देत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

 

LawMarathi परिवारातर्फे सोली सोराबजी ह्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन आणि आदरांजली!

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!