परमवीर सिंह ह्यांची राज्य सरकारविरुद्ध नवीन याचिका
 

परमवीर सिंह ह्यांनी महाराष्ट्र सरकार विरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल केली आहे.

 

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह ह्यांनी राज्य सरकारने त्यांच्याविरुद्ध काढलेल्या चौकशीच्या अडेशांना ह्या याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

 

कोणत्या आदेशांना आव्हान?

 

महाराष्ट्र सरकारने १ एप्रिल रोजी एका आदेशाद्वारे Antilia स्फोटक प्रकरणी कर्तव्यपालनात कसूर झाल्याच्या आरोपावरून परमवीर सिंह ह्यांच्या चौकशीचा आदेश जारी केला होता. सेवा ( वर्तणूक ) नियम परमवीर सिंह ह्यांनी भंग केल्याचे दोषारोप पडताळण्यासाठी राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे ह्यांना प्राथमिक चौकशी सुरू करण्याचे ह्या आदेशात म्हंटले होते. त्या आदेशाला ह्या याचिकेत आव्हान देण्यात आले आहे.

 

अनुप डांगे नामक एका पोलिस निरीक्षकाने परमवीर सिंह ह्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ह्या आरोपांची चौकशी करण्याचा आदेश सरकारने २० एप्रिल रोजी जारी केला होता. ह्या आदेशाला देखील ह्या याचिकेत आव्हान दिलेले आहे.

 

परमवीर सिंह ह्यांनी ह्यापूर्वी हाय कोर्टात एक याचिका दाखल केली होती. त्यांनी आपल्या एका पत्राद्वारे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांच्यावर खंडणीखोरी, भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. ह्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी ह्यासाठी ही याचिका होती. ह्या याचिकेवर न्यायालयाने हे प्रकरण CBI कडे सोपवले होते. सीबीआय ने त्यात चौकशी नंतर अनिल देशमुख यांच्याविरुद्ध FIR दाखल केला आहे.

 

परमवीर ह्यांनी केलेल्या ह्या नवीन याचिकेत सीबीआयने ह्या प्रकरणात गुन्हेगारी कट रचला गेलेला आहे का ह्याची चौकशी करावी असे आदेश कोर्टाने द्यावे अशीही मागणी केलेली आहे.

 

काल रात्री परमवीर सिंह आणि इतर काही पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध अट्रोसिटीच्या कायद्याखाली गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आहे.

 
हे वाचले का?
 

देशमुख प्रकरण: सीबीआयच्या FIR मध्ये लिहिलंय काय?

 

परमवीर सिंह V/S अनिल देशमुख: सीबीआय चौकशीचे न्यायालयाचे आदेश

One thought on “परमवीर सिंह ह्यांची राज्य सरकारविरुद्ध नवीन याचिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!