न्या. चंद्रचूड आणि ४ वाजता चा चहा…

सगळ्या भारतीयांचा आणि विशेषतः वकील मंडळींचा अगदी जीव की प्राण असलेली गोष्ट म्हणजे गरमागरम चहा..

ह्या चहा वर सर्वोच्च न्यायालयात मोठी चर्चा रंगली.

मंगळवारी न्या. चंद्रचूड आणि न्या. शहा एक टोल संबंधी प्रकरण ऐकत होते. समोर अभिषेक मनू सिंघवी, पराग त्रिपाठी असे मोठे वकील युक्तिवाद करत होते. ४ वाजले आणि न्या. चंद्रचूड म्हणाले, " तुम्ही लोक ४ वाजता चहा प्यायची इच्छा न होता कसं युक्तिवाद करत राहता..? मला तर जमतच नाही. मला ४ वाजताचा चहा लागतोच..”

 

मुंबई हाय कोर्ट आणि गरम चहा चा वास...

 

त्यानंतर न्या. चंद्रचूड आपल्या मुंबई हाय कोर्टातल्या आठवणीत रंगले आणि एक किस्सा सांगू लागले..

" मी मुंबई हाय कोर्टात वकिली करत होतो. तिथे पहिल्या मजल्यावर कोपऱ्यात एक कॅन्टीन होतं.. स्टाफ कॅन्टीन.. त्या कॅन्टीन मध्ये मी चहा घ्यायला जायचो. पण मग मी न्यायाधीश झालो. आणि नेमका मी त्या canteen ला लागून असलेल्या courtroom मध्ये बसत होतो.. रोज सकाळी ११ वाजता कॅन्टीन मध्ये चहा उकळायला लागायचा आणि त्याचा वास मला courtroom मध्ये यायचा.. पण जाणार कसं? बेंच वरून थेट २ वाजता लंच ब्रेक झाला की उठता यायचं. आणि न्यायाधीश झाल्यामुळे थेट उठून कॅन्टीन मध्ये जाणंही शक्य नव्हतं.”

 

पुढे त्यांनी आपल्या बरोबर खंडपीठासीन असलेल्या न्या. शहांना विचारलं, " बंधू, तुम्हाला ४ वाजता चहा घ्यायची इच्छा नाही होत?”

 

न्या. शहा त्यावर म्हणाले, " काही सीनिअर वाकीलांसाठी चहा ह्या शब्दाचा वेगळा अर्थ असेल, पण मी गुजरातचा आहे. आमच्याकडे फक्त चहाच मिळतो, दुसरं काही नाही.”

 

दुपारचे ४ ही सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी संपण्याची वेळ. ही वेळ उलटून गेली तरी वकील युक्तिवाद करत होते. त्यावेळी कोर्टात काल ही अशी चाय पे चर्चा रंगली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!