मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने आज जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना हा सवाल केला.
औरंगाबाद खंडपीठासमोर आज कोरोना व्यवस्थापनासंबंधी सुओं मोटो याचिकेवर सुनावणी सुरू होती. ह्या सुनावणी दरम्यान ऍड प्रज्ञा तळेकर ह्यांच्या मार्फत दाखल केलेल्या एका जनहित याचिकेची देखील न्यायालयाने दखल घेतली.
ही याचिका अहमदनगरचे भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉ. सुजय विखे ह्यांच्या संबंधी आहे. विखे ह्यांनी चार्टर्ड विमानाने दिल्लीहून Remdesivir चे १०,००० वायल आणल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये आल्या होत्या. ह्याविषयी काही फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडिया वर दिसत होते. ह्याच संबंधी ही जनहित याचिका दाखल झाली आहे. याचिकाकर्त्यांनी नावे अनुक्रमे अरुण पुंजाजी कडू, एकनाथ चंद्रभान घोगरे, बाळासाहेब केरूनाथ विखे व दादासाहेब पवार अशी आहेत.
हे Remdesivir सरकारने ताबडतोब ताब्यात घ्यावे आणि त्याचे सरकारने ठरवून दिलेल्या वाटणी नुसार पूनर्वाटप व्हावे, अशी मागणी ह्या याचिकेत करण्यात आली आहे.
जर हा Remdesivir चा साठा ठरलेल्या SoP किंवा मार्गदर्शक तत्त्वांनुसार आणलेला नसेल, तर त्याबाबतीत योग्य ती कारवाई करावी, आरोप खरे ठरल्यास गुन्हा दाखल करावा, असे सुनावणीदरम्यान न्यायालयाने तोंडी नोंदवले.
एक खासदार तुमच्या नाकाखालून वायल आणतातच कसे असा सवाल ह्यावेळी कोर्टाने सरकारला केला. ही याचिका कोर्टाने फौजदारी रिट याचिका म्हणून दाखल करून घेतली आहे.
याचिका वाचण्यासाठी इथे क्लिक करा
खा. विखे ह्यांनी remdesivir उपलब्ध करून दिल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील अनेकांनी सोशल मीडिया वरून त्यांचे आभार मानले होते. याचिकाकर्ते हे विखेंचे राजकीय विरोधक असल्याने त्यांनी ही याचिका दाखल केल्याचे विखे समर्थक सांगत आहेत. याचिकाकर्त्यांपैकी अरुण कडू हे काँग्रेस नेते मंत्री बाळासाहेब थोरात ह्यांचे जवळचे नातेवाईक असल्याचेही समजते आहे.
One thought on “एक खासदार तुमच्या नाकाखालून रेमडेसिविर आणतातच कसे? : उच्च न्यायालय”