ऑक्सिजन स्वस्त होणार: केंद्राकडून सीमा शुल्क माफ

पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी ऑक्सिजन पुरवठा अधिक सुरळीत व्हावा ह्यासाठी घेतलेल्या उच्च स्तरीय बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे.

 

देशात आयात करण्यात येणाऱ्या मेडिकल ग्रेड ऑक्सिजन आणि ऑक्सिजन संबंधी सर्व उपकरणांवरील सीमा शुल्क ( Custom Duty ) आणि आरोग्य उपकर ( health cess ) संपूर्णपणे माफ करण्यात आला आहे.

 

केंद्र सरकारने Remdesivir वरील सीमा शुल्क यापूर्वीच माफ केले होते.

 

ह्या आहेत शुल्क माफ झालेल्या गोष्टी,

 

1.   वैद्यकीय वापरासाठीचा ऑक्सिजन

2.   ऑक्सिजन कॉंन्सन्ट्रेटर तसेच फ्लो मीटर, रेग्युलेटर, कनेक्टर आणि टयुबिंग

3.   व्हॅक्युम प्रेशर स्विंग अब्सॉर्प्शन आणि प्रेशर स्विंग अब्सॉर्प्शन ऑक्सिजन प्लांट्स, द्रवरूप किंवा वायुरूप ऑक्सिजन निर्माण करणारी क्रायोजेनिक ऑक्सिजन एयर सेपरेशन युनिट्स

4.   ऑक्सिजन कॅनिस्टर

5.   ऑक्सिजन भरण्याची यंत्रणा

6.   ऑक्सिजन साठविण्याचे टँक, क्रायोजेनिक सिलेंडर्स आणि टँक्स यांच्यासह सर्व ऑक्सिजन सिलेंडर्स

7.   ऑक्सिजन जनरेटर्स

8.   ऑक्सिजनच्या जलवाहतुकीसाठी आयएसओ कंटेनर्स

9.   ऑक्सिजनच्या रस्तेमार्गाने वाहतुकीसाठी क्रायोजेनिक टँक्स

10. ऑक्सिजनची निर्मिती, वाहतुक, वितरण किंवा साठवणीसाठी आवश्यक   साधनांच्या निर्मितीसाठी वर दिलेल्या साधनांचे सुटे भाग

11. ऑक्सिजन निर्मिती करू शकेल असे दुसरे कोणतेही साधन

12. व्हेन्टिलेटर्स (उच्च प्रवाहसाठी साधन म्हणून वापरण्याची क्षमता असणारे) तसेच नेजल कॅन्युला, सर्व जोडण्या आणि टयुबिंग असणारे कॉम्प्रेसर्स

13. उच्च प्रवाहासाठी योग्य नेजल कॅन्युला आणि त्याच्या सर्व संलग्न वस्तू

14. नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेन्टिलेशनसाठी शिरस्त्राण

15. अतिदक्षता विभागातील व्हेन्टिलेटरसाठी नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेन्टिलेशनकरिता वापरण्यात येणारा नाक-तोंडाचा मास्क

16. अतिदक्षता विभागातील व्हेन्टिलेटरसाठी नॉन-इन्व्हेसिव्ह व्हेन्टिलेशनकरिता वापरण्यात येणारा नाकाचा मास्क

 

ह्या सर्व वस्तूंवरील सीमा शुल्क आणि आरोग्य उपकर माफ केल्याने ह्या वस्तू स्वस्त दरात उपलब्ध होतील आणि त्या अधिक प्रमाणात उपलब्ध करून घेता येतील.

 

याचबरोबर आणखी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हणजे येत्या तीन महिन्यात भारतात आयात होणाऱ्या कोरोना लसींवरील  मूलभूत सीमा शुल्क सुद्धा माफ करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!