न्या. रमणा ह्यांचा शपथविधी सोहळा संपन्न
 

भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती एन. व्ही रमणा ह्यांनी आज शपथ घेतली.

 

हा शपथविधी सोहळा सकाळी ११ वाजता संपन्न झाला. न्या. रमणा ह्यांना महामहीम राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद ह्यांनी शपथ दिली.

   

ह्या प्रसंगी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य मोजके मान्यवर उपस्थित होते. शपथ ग्रहण करताच न्या. रमणा ह्यांनी नमस्कार करून सर्वांचे अभिवादन केले.

 

न्या. रमणा हे एका सामान्य शेतकरी कुटुंबातले, कुठलाही वकिली वारसा नसलेले न्यायमूर्ती आज भारताचे सरन्यायाधीश झाले आहेत. त्यांची कारकीर्द सर्व नवोदित वकीलांसाठी प्रेरणादायी आहे.

 

त्यांच्या आयुष्याचे पैलू उलगडणारा आमचा हा लेख नक्की वाचा,

 

न्या. रमणा ; शेतकऱ्याचा मुलगा ते देशाचे सरन्यायाधीश

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!