मुंबईतील वाहनांसाठीची स्टिकर सक्ती रद्द
 

मुंबईत कलम १४४ अंतर्गत वाहने घेऊन बाहेर पडायचे असल्यास त्यावर स्टिकर लावण्याची सक्ती १८ एप्रिल पासून करण्यात आली होती.

ही स्टिकर सक्ती आता रद्द करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आता मुंबईत कोणत्याही वाहनाला लाल, पिवळे, हिरवे स्टिकर लावण्याची आवश्यकता नाही.

   

परंतु संचारबंदी लागू असल्याने वाहने विनाकारण बाहेर काढण्यावर बंदी आहे. त्यामुळे स्टिकर सक्ती रद्द केली म्हणजे संचार करण्यावरचे निर्बंध हतबल असे नाही. सर्व वाहने  तपासली जात राहतील.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!