‘ कोलेजियम ’ वरचा मराठी ठसा कायम
 

सरन्यायाधीश पदावरून न्या. शरद बोबडे आज निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर न्या. एन व्ही रमणा हे भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारतील.

ह्यात विशेष म्हणजे आत्तापर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या कोलेजियम वर ५ पैकी ३ न्यायमूर्ती मराठी होते आणि न्या. बोबडेंच्या निवृत्तीनंतरही हा मराठी ठसा कायम राहणार आहे. कारण collegium चे नवीन सदस्य न्या. धनंजय चंद्रचूड असणार आहेत.

 

कोण असतील Collegium चे सदस्य?

२४ एप्रिल रोजी न्या. रमणा ह्यांच्या शपथविधीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या collegium चे सदस्य हे असतील,

 
न्या. एन व्ही रमणा 
न्या. रोहींटन नरिमन
न्या. उदय लळीत 
न्या. अजय खानविलकर 
न्या. धनंजय चंद्रचूड
 

ह्या पाच न्यायमुर्तींपैकी तीन म्हणजेच न्या. लळीत, खानविलकर आणि चंद्रचूड मराठी आहेत.

 

कोलेजियम म्हणजे काय?

भारतात सर्वोच्च आणि उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणूक करण्यासाठी कोलेजियम ही व्यवस्था अस्तित्वात आहे.

Collegium म्हणजे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्तींचे मंडळ. सरन्यायाधीश आणि ज्येष्ठता यादीत त्यांच्या खालोखाल असलेले ४ न्यायमूर्ती ह्यांचे हे मंडळ असते. हे मंडळ न्यायाधीशांच्या नेमणुका करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस पाठवते आणि त्या शिफारसीनुसार राष्ट्रपती न्यायाधीशांची नियुक्ती करतात.

 

महाराष्ट्रासाठी ३ मराठी न्यायमूर्ती Collegium मध्ये असणे ही गौरवास्पद बाब आहे. न्या. बोबडे निवृत्त झाल्यानंतरही हा मराठी टक्का कायम असणे ही समस्त मराठीजनांसाठीअभिमानाची गोष्ट आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!