सीएसआर म्हणजेच Corporate Social Responsibility साठी लागू असलेल्या कायद्याच्या तरतुदींनुसार कोरोना साठी तात्पुरती इस्पितळे किंवा Covid केअर सेंटर उभारणे ही सीएसआर ॲक्टिविटी म्हणून ग्राह्य धरली जाईल.
कंपन्यांना आपला सीएसआर फंड आता ह्या कामांसाठी वापरता येईल.
कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने एका सर्क्युलार द्वारे हे जाहीर केले आहे. मागच्या वर्षी जाहीर केलेल्या आदेशानुसार Covid-19 साठी केलेला खर्च सीएसआर अक्टिविटी म्हणून ग्राह्य धरला जात आहेच. परंतु ह्या आदेशानुसार ह्यावर अधिक स्पष्टता झाली आहे.