मार्च २०२० पासून कोरोना महामारीने संपूर्ण जगाला ग्रासले आहे. ह्या काळात वकिलांना विशेष अडचणींना सामोरे जावे लागले आहे. न्यायालये बराच काळ बंद होती, त्यामुळे आपल्या वकील बंधू भगिनिंचा व्यवसाय ठप्प होता. अजूनही तो म्हणावा तसा पूर्ववत झालेला नाही, उलट पुन्हा एकदा लागलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा सगळे ठप्प होते आहे.
ह्या कठीण काळात आपल्याला आपल्या बार असोसिएशन, कुठल्या वकिलांच्या संघटना, आपले सीनिअर ह्यांनी कुठल्याही स्वरूपाची मदत केली असेल तर त्याविषयीचे अनुभव लिहून आम्हाला पाठवा.
ही मदत कुठल्याही स्वरूपाची असू शकते, आर्थिक, वैद्यकीय, घरगुती, शैक्षणिक, इ. कोणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कसे करायचे हे शिकवले, कोणी आपल्याकडची कायद्याची पुस्तके वापरायला दिली, कोणी मोफत एखादा कायदेविषयक कोर्स घेतला, कोणी आर्थिक सहाय्य केले, अशी कुठलीही मदत ज्यामुळे हा कोरोना काळ आपल्यासाठी थोडासा तरी सुसह्य झाला, आम्हाला लिहून कळवा.
ह्यापैकी काही निवडक अनुभव आम्ही आपल्या LawMarathi.com वर प्रसिद्ध करू.
आपले अनुभव lawmarathi.com@gmail.com ह्या आमच्या ईमेल ॲड्रेस वर पाठवा.
शब्दमर्यादा - ३५०
अंतिम तारीख - ३० एप्रिल २०२१
आपल्या ईमेलची आम्ही वाट बघत आहोत!