हाय कोर्टांतील याचिकांमुळे गोंधळ: ‘सर्वोच्च’ ने कोरोना संबंधी विषयांची घेतली दखल

कोरोना व्यवस्थापनाशी संबंधित विविध विषयांवर देशातील ६ उच्च न्यायालयांमध्ये याचिका दाखल झालेल्या असतानाच आज सर्वोच्च न्यायालयाने ह्या सर्व याचिका आपल्याकडे वळवून घेण्याचे संकेत दिले आणि कोरोना संबंधी प्रश्नांची सुओ मोटो दखल घेतली.

 

सुप्रीम कोर्टाने ४ मुद्द्यांवर दखल घेण्याचे ठरवले आहे.  हे चार मुद्दे म्हणजे,

१. ऑक्सिजन पुरवठा

२. आवश्यक औषधांचा पुरवठा

३. लसीकरण

४. लॉकडाउन लावण्याचा कोर्टाला अधिकार आहे की नाही

 

ह्या चार मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालय सुनावणी घेईल. न्यायालयाने ज्येष्ठ वकील हरीश साळवे ह्यांची अमायकस क्युरी म्हणजेच कोर्टाचा मित्र म्हणून नेमणूक केली. ह्याचाच अर्थ साळवे कुठल्याही एका पक्षाची बाजू न मांडता तटस्थपणे कोर्टाला निर्णयापर्यंत पोहोचण्यास मदत करतील.

   

देशातील ६ उच्च न्यायालयांत Corona महामारी संबंधी याचिका दाखल झालेल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयातही ह्या याचिकांवर नागपूर तसेच मुंबई पिठांसमोर सुनावणी चालू आहे.  ह्या सर्व याचिकांमुळे गोंधळ निर्माण होत असल्याच्या कारणाने आता सुप्रीम कोर्ट ह्या याचिका आपल्याकडे वळवून घेण्याची शक्यता आहे.

 

कोर्टाच्या ह्या निर्णयावर अनेकांनी नापसंती दर्शवली आहे. उच्च न्यायालये त्या त्या राज्यातील परिस्थिती अधिक व्यवस्थित समजून घेऊ शकतात त्यामुळे सुप्रीमचा हा निर्णय योग्य नसल्याचे मत अनेकांकडून व्यक्त होत आहे.

   

One thought on “हाय कोर्टांतील याचिकांमुळे गोंधळ: ‘सर्वोच्च’ ने कोरोना संबंधी विषयांची घेतली दखल

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!