देशात विविध राज्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन ची मागणी वाढत आहे. अशा वेळी देशात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा ह्यासाठी केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने सर्व राज्यांना काही निर्देश दिले आहेत.
काय आहेत हे निर्देश?
आंतरराज्य मेडिकल ऑक्सिजन वाहतुकीवर कोणतेही निर्बंध लादण्यात येऊ नयेत. परिवहन अधिकाऱ्यांनी ही वाहतूक विना अडथळा होईल ह्याची जबाबदारी घ्यावी.
आपल्या राज्यातील मेडिकल ऑक्सिजन उत्पादक, वितरक ह्यांना इतर राज्यात ऑक्सिजन पुरवठा करण्यास प्रतिबंध करू नये.
शहरांमध्ये मेडिकल ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वेळांची मर्यादा असू नये.
एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात ऑक्सिजन घेऊन जाणारी वाहने अधिकाऱ्यांनी ताब्यात घेऊ नयेत.


हे नियम सर्व राज्यांनी काटेकोरपणे पाळावे असे केंद्र सरकारने राज्यांना सूचित केले आहे. याचबरोबर ऑक्सिजनचा व्यावसायिक वापर करण्यास प्रतिबंध असल्याचेही पुन्हा निदर्शनास आणून दिले आहे.