महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज राज्य सरकारने ' ब्रेक द चेन ' मोहिमेअंतर्गत नवीन निर्बंध जाहीर केले आहेत.
हे निर्बंध २२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात सर्वत्र लागू होतील.
ह्यात लग्न समारंभावर नवीन कडक निर्बंध लावले आहेत. ह्यापूर्वी ५० माणसांच्या उपस्थितीत लग्न सोहळे करण्यास परवानगी होती. परंतु नवीन नियमांनुसार लग्न सोहळ्यावर हे निर्बंध लागू असतील,
लग्नात फक्त एकच समारंभ ( event ) करण्यास परवानगी असेल.
संगीत, हळद असे एकापेक्षा अधिक कार्यक्रम करता येणार नाहीत.
एकाच ठिकाणी किंवा एकच कार्यालयात लग्न सोहळा करण्यास परवानगी असेल.
संपूर्ण लग्न सोहळा २ तासाच्या वेळात संपवावा लागेल. त्यापेक्षा जास्त वेळ कार्यक्रम चालू ठेवण्यास परवानगी नसेल.
लग्न सोहळ्यात केवळ २५ व्यक्तींना सहभागी होता येईल.
ह्यापैकी कुठल्याही नियमांचा भंग झाल्यास त्या परिवाराला ५०,००० रुपये दंड करण्यात येईल.
आणि नियमभंग करणारे कार्यालय, ठिकाण, इ. कोरोना प्रादुर्भाव अस्तित्वात असेपर्यंत बंद केले जाईल.

महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती अत्यंत संवेदनशील आहे आणि रोजची नवीन रुग्णांची संख्या ६०,००० च्या घरात आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने हे नवीन निर्बंध लादले आहेत. १ मे पर्यंत हे निर्बंध असेच लागू राहतील. त्यानंतर सरकार परिस्थिती बघून निर्बंध शिथिल करायचे की नाही हा निर्णय घेईल.