रामजन्मभूमीच्या न्यायालयीन लढ्याचे सेनापती कोण होते? वाचा

आज रामनवमी म्हणजेच प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव. ह्या दिवसाचे औचित्य साधून आज एका अशा महान व्यक्तीची ओळख करून घेऊया ज्यांनी साक्षात प्रभू रामचद्रांचे वकीलपत्र घेतले.

 

 उत्तर प्रदेशातील अयोध्या येथे श्रीरामाचा जन्म झाला. तेथे श्रीरामाचे मंदिर होते. ते मंदिर मुघल आक्रमक बाबर ह्याने उद्ध्वस्त केले आणि त्याजागी बाबरी मशीद बांधली.

 

ह्या रामजन्मभूमी येथील मंदिराची जागा हिंदूंना परत मिळावी आणि तेथील बाबरी मशिदीचा अवैध कब्जा हटवण्यात यावा ह्यासाठी देशात मोठे जनआंदोलन उभे राहिले. १९९२ साली तेथील बाबरी मशिदीचा काही भाग आंदोलकांनी पाडला.  हा लढा फक्त आंदोलनापुरता मर्यादित न राहता वर्षानुवर्षे न्यायालयातही लढला जात होता.

 

रामजन्मभूमी साठी चाललेल्या लढ्याचा शेवट ९ नोव्हेंबर २०१९ ह्या ऐतिहासिक दिवशी झाला. ह्या दिवशी माननीय सर्वोच्च न्यायालयाने ही संपूर्ण विवादित जमीन 'रामलल्ला विराजमान' च्या हक्काची असल्याचे घोषित करत तेथे राम मंदिर उभारण्याचा मार्ग प्रशस्त  केला.

कोण होते ह्या न्यायालयीन लढ्याचे सरसेनापती?

 

' रामलल्ला विराजमान ' म्हणजेच प्रभू श्रीरामाचे बालस्वरुप हे ह्या दाव्यात साक्षात पक्षकार होते आणि ह्या साक्षात श्रीरामाचे वकील होते केशव पराशरन.

 

के. पराशरन हे एक ज्येष्ठ कायदेपंडित आहेत. त्यांनी रामजन्मभूमी प्रकरणात राम लल्लाची बाजू अत्यंत प्रभावीपणे मांडली.

 

वयाच्या ९३ व्या वर्षात असलेल्या ह्या महान वकिलाने कोर्टात तासन् तास सलग उभे राहून युक्तिवाद केला. दशकानुदशके चाललेला हा रामजन्मभूमी - बाबरी मशीद वाद संपावा ही आपली मरणापुर्वीची अखेरची इच्छा असल्याचे ते कोर्टात म्हणाले होते.

 

सहा दशके व्यापलेल्या त्यांच्या वकिली व्यवसायात त्यांनी यशाची अनेक शिखरे सर केली. ते १९७६ साली तामिळनाडू राज्याचे महाधिवक्ता झाले. १९८३-८९ ह्या काळात ते देशाचे Attorney General होते.

 

के पराशरन ह्यांना भारत सरकारतर्फे २००३ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. २०११ साली त्यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०१२ साली त्यांना राष्ट्रपतींनी राज्य सभेचे सदस्यत्व बहाल केले.

 

त्यांच्या अफाट ज्ञानामुळे आणि वकिली कौशल्यामुळे सर्वच पक्षांची सरकारे त्यांची मदत घेत.

 

त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राम जन्मभूमी प्रकरणात अत्यंत कष्ट घेऊन बाजू मांडली. त्यांचा हिंदू धर्म आणि हिंदू न्यायशस्त्राचा गाढा अभ्यास ह्यात कामी आला.

 

४३३ वर्षांपूर्वी रामाच्या जन्मस्थनी मशीद बांधून बाबराने ऐतिहासिक चूक केली आणि ती आता सुधारण्याची गरज आहे असे त्यांनी आपल्या युक्तिवादात न्यायालयासमोर मांडले. मुस्लिम अयोध्येतल्या इतर कुठल्याही मशिदीत प्रार्थना करू शकतात; पण हिंदूंसाठी श्रीरामाचे हे जन्मस्थान आहे आणि ते आम्ही बदलू शकत नाही, हा त्यांचा युक्तिवाद अत्यंत महत्त्वाचा होता. मुळात बाळ रुपातल्या रामालाच पक्षकार करावे ही कायदेविषयक महत्त्वाची ठरलेली रणनीती देखील त्यांनीच सुचवली होती असे म्हणतात.

   
K parasaran
के. पराशरन राम मंदिर भूमिपूजन सोहळा आपल्या परिवारासमेत आस्थेने बघतानाचे दृश्य
   

निस्सीम देवभक्ती, ऊर्जा, उत्साह, कायद्याची जाण, आपल्या विरोधी वकीलांविषयी कुठलाही आकस न बाळगणं, संपूर्ण तयारीनिशी कोर्टात हजर राहणं अशा अनेक गुणांमुळे त्यांनी विधिविश्र्वात आदराचे स्थान मिळवले आहे. त्यांचे पुत्र देखील वकील असल्याने त्यांना  ' सीनिअर पराशरन ' अशा नावानेही ओळखतात.

 

रामजन्मभूमी प्रकरणात विजयी झाल्यानंतर जी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट जन्माला आली त्या ट्रस्ट चे ट्रस्टी म्हणून  सरकारने के. पराशरन ह्यांची नियुक्ती केली आहे.

 
ही माहिती तुम्हाला आवडली तर नक्की शेअर करा आणि तुमचे अभिप्राय आम्हाला कॉमेंट करून कळवा.
        कायदेविषयक माहिती आणि बातम्यांसाठी LawMarathi च्या फेसबुक पेजला follow करायला विसरू नका               https://m.facebook.com/LawMarathiCom/?tsid=0.7100961143690825&source=result    

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!