न्या. नरिमन ह्यांच्या ऋग्वेदाविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अनेकांकडून संतप्त प्रतिक्रिया
 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंटन फली नरिमन ह्यांच्या ऋग्वेदाविषयी केलेल्या वक्तव्यावर विविध नागरिक आणि संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

 

काय आहे हे वक्तव्य?

 

१६ एप्रिल रोजी न्या. सुनंदा भंडारे स्मृती व्याख्यान कार्यक्रमात न्या. नरिमन ह्यांचे 'इतिहासातील महान महिला ' ह्या विषयावर व्याख्यान होते. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, " ऋग्वेद असे सांगतो की स्त्रियांशी चिरकालासाठी मैत्री करू नका कारण त्या तरस ह्या प्राण्यासारख्या असतात."

 

न्या. नरिमन ह्यांचे हे वक्तव्य ऐकून अनेकांनी अनेकांनी त्यांना ऋग्वेदाचा अर्थ समजला नसल्याचे मत व्यक्त केले.

 

 न्या. नरिमन ह्यांनी ऋग्वेदातील एका प्रसंगात अप्सरा उर्वशी हिच्या तोंडी असलेल्या एका वाक्याचा विपर्यास केला असे अनेकांचे मत आहे. हे वाक्य हा ऋग्वेदाचा संदेश नाही. संपूर्ण वेद न वाचता केवळ एक वाक्य उचलून न्या. नरिमन ह्यांनी चुकीचा अर्थ लावला असेही मत समाज माध्यमांवर व्यक्त होत आहे.

 

वर्ल्ड हिंदू फाउंडेशन ह्या संस्थेच्या स्वामी विज्ञानानंद ह्यांनी एक प्रसिद्धी पत्रक काढून न्या. नरिमन ह्यांना हे विधान मागे घेण्याचे आवाहन केले आहे. ऋग्वेदाच्या जसेच्या तसे भाषांतर करून तो समजून घेता येऊ शकतं नाही. त्यासाठी इतर अनेक शास्त्रांचे ज्ञान असणे गरजेचे आहे. न्या. नरिमन यांच्यासारख्या जबाबदारीच्या पदावर असलेल्या व्यक्तीने संपूर्ण ज्ञान नसताना असे वक्तव्य करणे योग्य नसल्याचे ह्या पत्रकात म्हंटले आहे.

  World Hindu Foundation on Justice Nariman's statement  

न्या. नरिमन हे  ज्येष्ठ वकील फली नरिमन ह्यांचे पुत्र असून ते बांद्रा अग्यारी कडून पारशी धर्माचे पुजारी म्हणूनही नेमले गेले होते, असे म्हणतात.

     

2 thoughts on “न्या. नरिमन ह्यांच्या ऋग्वेदाविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर अनेकांकडून संतप्त प्रतिक्रिया

  1. His speech was on different subject. But he purposely spoke about Rigveda.
    No person other than Hindu should have right to speak about Hindu religion.
    Mr. Nariman should release his mafipatra.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!