मुंबईत संचारबंदी दरम्यान वाहनांसाठी स्टिकर सक्ती: वाचा काय आहेत नियम
 

मुंबई पोलिसांनी आज फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ अंतर्गत एक नवीन नियम लागू केला आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून हा नियम १८ एप्रिल पासून मुंबईत लागू होईल.

 

काय आहे हा नियम?

 

मुंबईत वाहन घेऊन घराबाहेर पडायचे असल्यास वाहनावर एक गोलाकार रंगीत स्टिकर लावणे बंधनकारक असेल. विविध कारणांसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांसाठी वेगवेगळे रंग नेमून देण्यात आले आहेत. वाहनाचा उपयोग ज्या कारणासाठी होत असेल त्या साठी नेमून दिलेल्या रंगाचे स्टिकर वाहनाला लावावे लागेल.

 

कोणत्या वाहनांना कोणता रंग?

 

लाल रंग - आरोग्य सुविधा, दवाखाने, औषधे/ मास्क उत्पादक, वितरक अशा सर्व वाहनांसाठी लाल रंगाचे स्टिकर लावायचे आहे.

 

हिरवा रंग - अन्नधान्य / खाद्यपदार्थ, किराणा, भाज्या, फळे ह्यांच्या वाहतुकीसाठी वापरत असलेल्या वाहनावर हिरवे स्टिकर लावायचे आहे.

 

पिवळा रंग - सर्व सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवा कर्मचारी, सूूट  मिळालेल्या वाहनांना पिवळ्या रंगाचे स्टिकर लावायचे आहे.

 
वकिलांनी, पत्रकार, माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांनी आपल्या वाहनांवर पिवळ्या रंगाचे स्टिकर लावायचे आहे.
 

स्टिकर कुठे मिळणार ?

 

हे स्टिकर वाहन चालक / मालक ह्यांनी स्वतःच वाहनाला लावायचे आहे. नेमून दिलेल्या रंगाचे गोलाकार ६ इंची स्टिकर नागरिक छापून घेऊ शकतात किंवा नजीकच्या पोलिस ठाण्यातून घेऊ शकतात. चेकनाक्यावर पोलिसांना विनंती केल्यास असे स्टिकर ते मोफत उपलब्ध करून देऊ शकतील.

 

स्टिकर नसेल तर?

ह्या नियमानुसार जर मुंबईत स्टिकर न लावता वाहन चालवले तर आयपीसी कलम १८८ तसेच साथरोग कायदा आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

तसेच स्टिकर लावून वेगळ्याच कारणासाठी वाहन चालवत असेल तरी कारवाई केली जाईल.

  Mumbai police orders colour coding for vehicles during lockdown       कलम १४४ विषयी आमचा हा रिपोर्ट सुद्धा नक्की वाचा                               कलम १४४ नेमके आहे तरी काय? संचारबंदी की जमावबंदी? वाचा                              
ही माहिती सर्व मुंबईकर मित्र, नातेवाईक आणि सहकाऱ्यांना नक्की पाठवा.
             

2 thoughts on “मुंबईत संचारबंदी दरम्यान वाहनांसाठी स्टिकर सक्ती: वाचा काय आहेत नियम

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!