आज जरी केलेल्या परिपत्रकानुसार पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी Remdesivir इंजेक्शन चे रुग्णालय निहाय वाटप केले आहे. त्यामुळे आता पुण्यात Remdesivir मिळणे अधिक सोपे होणार आहे.
ह्या परिपत्रकाला एक यादी जोडण्यात आली असून ह्या यादीत प्रत्येक कोविड रुग्णालयाच्या नावासमोर त्या रुग्णालयाला नेमून देण्यात आलेली Remdesivir ची संख्या लिहिलेली आहे. तसेच कोणत्या वितराकाकडून ते घ्यायचे हे देखील लिहिलेले आहे.
रुग्णालयांना त्यांच्यासाठी नेमून दिलेल्या वितराकांकडून त्वरित हे Remdesivir घ्यायचे आहे आणि त्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या दराने मोबदला द्यायचा आहे.
नागरिकांना ह्या वितरकांकडून थेट Remdesivir मिळणार नसल्याचे ह्या परिपत्रकातून स्पष्ट होत आहे. केवळ रुग्णालयाच्या अधिकृत मागणीवर हा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे.
हे परिपत्रक व ही यादी आम्ही आपल्या माहितीसाठी देत आहोत.









ह्या निर्णयामुळे आता नागरिकांची Remdesivir मिळवण्यासाठी होणारी वणवण थांबेल अशी आशा आहे. तसेच ह्या आदेशानुसार Remdesivir चा नेमून दिलेला साठा केवळ रुग्णालयाच्या letter head वर लेखी स्वरूपात सही शिक्क्यासह मागणी केल्यावरच वितरकाकडून पुरवला जाणार आहे; त्यामुळे ह्या इंजेक्शनचा काळाबाजार देखील थांबेल अशी आशा आहे.