रमझान निमित्त उपास करणाऱ्या वकिलाची न्या. चंद्रचूड ह्यांनी का मागितली माफी? वाचा
 

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड ह्यांनी आज एका वकिलाची माफी मागितली.

 

न्या. चंद्रचूड आणि न्या. शहा ह्यांच्या खंडपीठाचे कामकाज सुरू होते. कामकाज संपायच्या वेळी एका वकिलाने आपली केस रमझान नंतर ठेवण्यात यावी अशी विनंती कोर्टाला केली.  ही विनंती करत असताना हा वकील म्हणाला, " मी दिवसभर माझे मॅटर सुनावणीसाठी पोहोचण्याची वाट बघत आहे."

 

ह्यावर ह्या वकिलाने रमझान निमित्त रोजा ठेवला असल्याचे न्या. चंद्रचूड ह्यांच्या लक्षात आले. त्यांनी लगेचच न्या. चंद्रचूड म्हणाले, " मला माफ करा. तुम्ही सकाळीच हे मॅटर mention केले असते तर आम्ही तुम्हाला तेव्हाच पुढची तारीख देऊन टाकली असती. आता कृपया जा आणि आराम करा"

 

यापुढे न्या. चंद्रचूड ह्यांनी आपल्याला अशा दिवसभर पाण्याचा थेंब सुद्धा न पिता उपास ठेवणाऱ्यांचे कौतुक वाटते असेही वक्तव्य केले.

 

ह्या घटनेवर विधी विश्र्वातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काहींनी न्या. चंद्रचूड ह्यांच्या माणुसकीचे कौतुक केले आहे. तर काहींनी केवळ रोझा  असल्यामुळे वकिलाला विशेष वागणूक मिळण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!