सर्व अंतरिम आदेश ७ मे पर्यंत लागू राहणार : मुंबई उच्च न्यायालय
 

राज्यात कोरोना विषाणूचा कहर बघता मुंबई उच्च न्यायालयाने न्यायप्रार्थी नागरिकांची गैरसोय होऊ नये ह्यासाठी आज एक आदेश जरी केला.  ह्या आदेशानुसार उच्च न्यायालय व राज्यातील सर्व कनिष्ठ न्यायालयांचे ९ एप्रिल वर त्यानंतर दिलेले अंतरिम आदेश ७ मे पर्यंत लागू राहतील.

 

अशा अंतरिम आदेशांची वैधता ७ मे च्या आधी संपुष्टात येत असेल तरी ते आदेश लागू राहतील. जर त्या आदेशामुळे असंतुष्ट पक्ष कोर्टात दाद मागू इच्छित असेल तर त्यांना विरोधी पक्षाला नोटीस  द्यावी लागेल.

 

मुंबई उच्च न्यायालयाने आजच सर्व कनिष्ठ न्यायालयाने SOP जारी केली आणि उच्च न्यायालय virtual पद्धतीने कामकाज करेल असेही ठरवले असल्याने हे आदेश जारी केले आहेत. कोर्ट पूर्णवेळ किंवा प्रत्यक्ष कार्यरत नसल्याने कोणावर अन्याय होऊ नये असा ह्या आदेशाचा हेतू आहे.

 

कुठल्याही अवराचा / मालमत्तेचा ताबा देण्यासाठी भाडे किंवा शुल्क भरण्याची अट ठेवणारे आदेश ही अट पूर्ण केली नसेल तरी ७ मे पर्यंत लागू राहतील. ७ मे पर्यंत कोणालाही भडे न भरल्याच्या कारणाने बाहेर काढता येणार नाही, असेही उच्च न्यायालयाने ह्या आदेशात स्पष्ट केले आहे.

 

कुठलेही बांधकाम पाडण्याची, कोणालाही बाहेर काढण्याची किंवा ताबा काढून घेण्याची झालेली ऑर्डर ७ मे पर्यंत बजावली जाणार नाही, हे देखील कोर्टाने सांगितले.

 

६ मे रोजी न्यायालय परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कामकाजाविषयी निर्णय घेईल.

   

ही ऑर्डर वाचण्यासाठी ह्या लिंक वर जा

मुंबई उच्च न्यायालयात आदेश १६/०४/२०२१

   

One thought on “सर्व अंतरिम आदेश ७ मे पर्यंत लागू राहणार : मुंबई उच्च न्यायालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!