पीएनबी घोटाळा: निरव मोदीच्या प्रत्यार्पणास युकेच्या गृह मंत्रालयाची मंजुरी

हिरे व्यापारी निरव मोदी ह्याचे प्रत्यार्पण करण्यास इंग्लंड च्या गृह सचिव प्रीती पटेल ह्यांनी आज मंजुरी दिली आहे. निरव मोदी हा PNB घोटाळ्यात आरोपी आहे.

 

निरव मोदी ह्या हिरे व्यापाऱ्यावर भारतात पंजाब नॅशनल बँक घोटाळा केल्याचा आरोप असून त्याच्यावर सीबीआय आणि ED ह्या दोन्ही तपास यंत्रणा त्याच्या मागावर आहेत. घोटाळा केल्याचे प्रकरण CBI, तर घोटाळ्यातील पैशांची अफरातफर केल्याचे प्रकरण ED कडे तपासाधीन आहे.

 

परंतु निरव मोदी त्याच्यावर कार्यवाही होईल ह्या भीतीने आधीच देश सोडून फरार झाला होता आणि इंग्लंड मध्ये जाऊन राहिला होता. त्याला भारतात आणण्यासाठी भारत सरकार त्याच्या प्रत्यार्पणासाठी ( extradition ) प्रयत्नशील होते.

 

फेब्रुवारी महिन्यात वेस्टमिन्स्टर कोर्टाने भारत सरकारच्या बाजूने निकाल देत निरव मोदीच्या प्रत्यार्पणाचा आदेश दिला होता.  ह्यानंतर इंग्लंड च्या गृह मंत्रालयाच्या परवानगीची गरज होती. आज गृह सचिव प्रीती पटेल ह्यांनी ही परवानगी दिली आहे.

 

निरव मोदीला भारतात आणण्याच्या प्रक्रियेत भारत सरकारला मिळालेले हे यश आहे. परंतु निरव मोदीकडे अजूनही काही मार्ग आहेत. ह्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा एक मार्ग त्याच्याकडे आहे. हे अपील त्याला १४ दिवसांच्या आत दाखल करावे लागेल

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!