जैन मंदिरांना अयांबिल उपवासाच्या अन्नाची होम डिलिव्हरी करण्यास हाय कोर्टाची मान्यता

जैन धर्मीय दरवर्षी ९ दिवस अयांबिल व्रत करतात. यादरम्यान ते फक्त मंदिरात बनवलेले उकडलेले साधे अन्न ग्रहण करतात. यावर्षी कोरोना मुळे राज्यातील प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. अशावेळी जैन मंदिरात हे अन्न तयार करून ते भाविकांना घेऊन जाण्यास परवानगी मिळावी ह्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती.

 

न्या. गुप्ते आणि न्या. अहुजा ह्यांच्या खंडपीठासमोर ह्या याचिकेवर सुनावणी झाली. मंदिरात उपवासाचे अन्न घ्यायला येणाऱ्यांची गर्दी होईल आणि त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव अधिक होऊ शकतो असे सरकारचे म्हणणे होते.

 

आम्ही भाविकांनी मंदिरात जमून हे अन्न ग्रहण करावे अशी मागणी करत नसून केवळ त्यांना मंदिरातून ते घेऊन जाता यावे एवढीच मागणी करत आहोत असे याचिका कर्त्यांनी सांगितले.

 

मागच्या आठवड्यात मुंबई उच्च न्यायालयाने मशिदीत रमजान निमित्त सामूहिक नमाज पठण करण्यास परवानगी नाकारली होती.

 

ह्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने उपवासाचे हे अन्न मंदिराने लोकांना घरपोच नेऊन द्यावे असा आदेश देत कोणालाही मंदिरात येऊन अन्न घेऊन जाण्याची परवानगी नाकारली आहे. होम डिलिव्हरी करताना कोरोना विषयक सर्व नियम पाळण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!