तरुणांना भुलवून लष्कर-ए-तय्यबा मध्ये भरती करणाऱ्या शिक्षकाला अटक

राष्ट्रीय तपास एजन्सी ( NIA ) ने काश्मीर मधील एका शिक्षकाला अटक केली आहे. इस्लामी दहशतवादी संघटना लष्कर - ए - तय्यबा साठी तरुणांना भरती करत असल्याचे तपासात उघड झाल्याने ही अटक झाली आहे.

 

काश्मीर मधील बांदीपुरा येथे राहणाऱ्या ह्या व्यक्तीचे नाव अल्ताफ अहमद असे आहे. पाकिस्तानातील लष्कर च्या अतिरेक्यांनी भारतातून तरुणांना भडकावून आपल्या संघटनेत भरती करून घेण्यासाठी आलेल्या योजनेत अल्ताफ सहभागी होता.

 

पश्चिम बंगाल मधील तानिया परवीन ही तरुणी लष्कर च्या संपर्कात असल्याचे लक्षात आल्यावर बंगाल पोलिसांनी FIR दाखल केली होती. पुढे हे प्रकरण तपासासाठी NIA कडे सोपवण्यात आले. तानिया हीचा सोशल मीडिया वरून अल्ताफशी संपर्क झाला. अल्ताफ ने तनियाचा पाकिस्तानातील लष्कर च्या अतिरेक्यांशी संपर्क साधून दिला. तानिया आणि अल्ताफ हे ह्या तरुणांना भडकावून, भुलवून लष्कर - ए- तय्यबा मध्ये भरती करण्याच्या कटात सामील होते.

 

तानिया परवीन विरुद्ध NIA ने यापूर्वीच चार्जशीट दाखल केली आहे. सोशल मीडिया चा वापर करून भारतातील तरुणांना इस्लामी कट्टरपंथी दहशतवादाच्या कारवायांमध्ये सामील करून घेण्याच्या ह्या योजनेचा NIA तपास करत आहे. अल्ताफची अटक ही ह्या तपासातील महत्त्वाची पायरी असल्याचे

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!