' आज तक ' ह्या हिंदी वृत्तवाहिनीला अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल केलेल्या अयोग्य वार्तांकनाबद्दल जाहीर माफी मागावी लागणार आहे आणि १ लाख रुपये दंड भरावा लागणार आहे.
News Broadcasting Standard Authority ह्या स्वायत्त संस्थेने हा निर्णय दिला आहे. ही संस्था विविध वृत्तवाहिन्यांनी एकत्र येऊन आपल्या वृत्तांकानाचे नियमन करण्यासाठी स्थापन केलेल्या न्यूज Broadcasters Association ह्या संस्थेचे एक अंग आहे. एखाद्या वृत्त वाहिनीने खोट्या, चुकीच्या बातम्या दाखवल्या किंवा अयोग्य वार्तांकन केले तर NBSA कडे तक्रार केली जाऊ शकते आणि NBSA अशा वाहिनीवर कार्यवाही करू शकते.
ह्या NBSA ने ६ ऑक्टोबर २०२० रोजी 'आज तक' वाहिनीला ही शिक्षा सुनावली होती. त्याविरुद्ध वाहिनीने पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. त्यावर निर्णय घेताना NBSA ने आपल्या आधीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
'आज तक' ने नेमके काय केले होते?
सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर दोन दिवसांनी 'आज तक' ने आपल्या वाहिनीवर काही tweets प्रसारित केली होती. ही tweets सुशांत ने आपल्या मृत्यूपूर्वी केल्याचे ह्या बातमीत आज तक ने दाखवले होते. परंतु अशी कोणतीही tweets सुशांत ने केली नव्हती.
हीच 'आज तक' ने बातमीत दाखवलेली ती tweets


आज तक च्या ह्या खोट्या आणि अयोग्य वार्तांकनामुळे आता ह्या वाहिनीला २३ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता आपल्या वाहिनीवरून जाहीर माफी मागावी लागणार आहे आणि १ लाख रुपये दंड देखील भरावा लागणार आहे.
#AajTak #SushantSinghRajput #NBSA