मथुरा येथील श्री कृष्ण जन्मस्थान मंदिरातील कृष्णाच्या मूर्तीचा शोध घेण्यासाठी आग्रा येथील जहानारा ( जामा ) मशिदीचे पुरातत्व सर्वेक्षण करा अशी मागणी करणारा अर्ज मथुरा दिवाणी न्यायालयात दाखल करण्यात आला आहे.
मथुरा येथील श्री कृष्णाच्या जन्मस्थानी असलेले मंदिर जमीनदोस्त करून औरंगजेबाने तेथे शाही इदगाह उभारला. त्यावेळी त्या मंदिरातील श्री कृष्णाची मूर्ती आग्रा येथील जा मशिदीखाली गाडून टाकण्यात आली होती.
भगवान श्रीकृष्ण विराजमान ह्या साक्षात कृष्ण देवतेच्या नावे मथुरा न्यायालयात एक दावा दाखल करण्यात आला आहे. हा दावा उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड यांच्याविरुद्ध असून ह्यात श्री कृष्ण जन्मस्थान असलेली जमीन श्री कृष्ण देवस्थान ट्रस्ट ह्यांची असल्याचे घोषित करावे आणि तेथून शाही इदगाह ची इमारत हटवण्यात यावी अशी मागणी केली गेली आहे.
ह्याच दाव्यात पुरातत्व सर्वेक्षणासाठीचा हा अर्ज दाखल करण्यात आला आहे.
मागील आठवड्यात वाराणसी येथील कोर्टाने काशी विश्वनाथ मंदिर दाव्यात पुरातत्व सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. त्याचाच आधार घेत मथुरा न्यायालयात हा अर्ज करण्यात आला आहे.
तुम्ही आमचा हा रिपोर्ट वाचलात का?
काशी विश्वनाथ: पुरातत्व सर्वेक्षणाच्या निर्णयाविरोधात हाय कोर्टात अर्ज
