मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी महाराष्ट्रात १ ने पर्यंत lockdown ची घोषणा केली आहे. राज्यात Corona विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ही घोषणा करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
राज्यात ह्या काळात कलम १४४ लागू असेल. त्यानुसार राज्यात कोणालाही अत्यावश्यक कारणाशिवाय संचार करण्यासही बंदी असणार आहे.
केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. ह्या सेवांची यादी देखील सरकारने जाहीर केली आहे.
काय असतील राज्यातील ह्या नवीन Lockdown चे नियम, वाचा,
- अत्यावश्यक सेवा विना निर्बंध चालू राहणार. अत्यावश्यक सेवा पुरवण्यात सहभागी सर्व व्यक्तींना संचार करण्याची परवानगी असेल.
अत्यावश्याक सेवांमध्ये काय काय असेल?
- आरोग्य सुविधा
- पशु दवाखाने, पशुखाद्य
- किराणा दुकाने, भाजी फळे विक्रेते, सर्व प्रकारच्या खाद्यपदार्थांची दुकाने
- सर्व सार्वजनिक वाहतूक
- शीतगृहे, गोदाम
- विविध देशांचे दूतावास व संबंधित कार्यालये
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व सेवा
- शेती व शेती संबंधित सर्व सेवा उद्योग
- बँकिंग
- मालवाहतूक
- पाणी पुरवठा
- आयात निर्यात
- अत्यावश्यक वस्तूंचे ecommerce
- मान्यताप्राप्त माध्यमे ( वृत्तपत्रे, टीव्ही चॅनल, ई.)
- पेट्रोल पंप
- Data Centres
- एटीएम
- पोस्ट सेवा
- वीज आणि गॅस पुरवठा
ह्या सेवांव्यातिरिक्त आणखी कोणत्या सेवा किंवा उद्योग अत्यावश्यक घोषित करायचे हे ठरवण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत.
- घरगुती काम करणारे, ड्रायव्हर ह्यांना परवानगी असेल की नाही हा निर्णय स्थानिक प्रशासन घेईल.
- वकिलांची कार्यालये जर न्यायालय, न्याय प्राधिकरण, चौकशी आयोग कार्यरत असेल तर सकाळी ७ ते रात्री ८ ह्या वेळात चालू ठेवता येतील.
- इतरही काही कार्यालये सकाळी ७ ते रात्री ८ ह्या वेळात चालू ठेवण्यास परवानगी आहे. ह्यात केंद्र राज्य सरकारची कार्यालये, वित्त संस्था, बँका, सहकारी बँका, विमा व मेडीक्लेम संस्था ह्यांचा समावेश असेल.
- सर्व उपहारगृहे आणि बार बंद राहतील
- खाद्यपदार्थांची होम डिलिव्हरी चालू ठेवता येईल.
- रस्त्याच्या बाजूला असलेल्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत पार्सल सेवा चालू ठेवता येईल.
- सिनेमागृहे, नाट्यगृहे बंद राहतील
- Waterparks, स्विमिंग पूल, Gym, व्यायामशाळा बंद राहतील
- सिनेमा, टीव्ही , जाहिराती यासाठीचे शूटिंग ( चित्रीकरण) बंद राहील.
- मॉल बंद राहतील
- धार्मिक, प्रार्थनास्थळे बंद राहतील
- ब्युटी पार्लर, स्पा, सलून बंद राहतील
- धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांना बंदी
- लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त २५ लोक उपस्थित राहू शकतील.
- अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त २० लोकांना हजर राहण्यास परवानगी
- बांधकाम कामगार त्या ठिकाणी राहत असल्यास काम चालू ठेवण्यास परवानगी
- हाउसिंग सोसायटी मध्ये ५ पेक्षा अधिक active corona रुग्ण असल्यास ती सोसायटी mini containment zone घोषित करण्यात येईल.
याचबरोबर कोरोना उपचारांसाठी ऑक्सिजन चा तुटवडा होत असल्याने ज्या उद्योगात ऑक्सिजन चा कच्चा माल म्हणून वापर केला जातो ते उद्योग पूर्ण बंद राहतील.
हे सर्व नियम १ मे पर्यंत काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. नियम न पाळल्यास कठोर कार्यवाही होणार आहे.
4 thoughts on “महाराष्ट्रात १ मे पर्यंत संचारबंदी; काय चालू, काय बंद राहणार? वाचा”