काशी विश्वनाथ: पुरातत्व सर्वेक्षणाच्या निर्णयाविरोधात हाय कोर्टात अर्ज
 

काशी विश्वनाथ विरुद्ध ज्ञानवापी मशीद प्रकरणात ८ एप्रिल रोजी वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाने एक निकाल दिला होता. त्यात सादर परिसराचे पुरत्व सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. ह्या आदेशाविरुद्ध अंजुमन इंतेजमिया मशीद यांच्यातर्फे अलाहाबाद उच्च न्यायालयात अर्ज करण्यात आला आहे.

 

वाराणसी येथील काशी विश्वनाथ मंदिर हे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ह्या मंदिराचा काही भाग उद्ध्वस्त करून १६६४ साली मुघल बादशहा औरंगजेब ह्याने ही ज्ञानवापी मशीद बांधली.

 

काशी विश्वनाथ देवस्थानतर्फे वाराणसी दिवाणी न्यायालयात २०१९ मध्ये दावा दाखल करण्यात आला. सदर जमीन ही मंदिराची असून तेथील मशीद पडून जागा मंदिराला परत करण्यात यावी अशी मागणी न्यायालयाला करण्यात आली आहे.

 

ह्याच दाव्यात सादर जागेचे पुरातत्व सर्वेक्षण करण्यात यावे व तेथे मंदिरच होते ह्याची सत्यता पडताळून पहावे अशी मागणी काशी विश्वनाथातर्फे करण्यात आली होती. ह्यावर ८ एप्रिल रोजी न्या.आशुतोष तिवारी ह्यांनी निकाल दिला. सदर जागेचे पुरातत्व सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी पुरातत्व सर्वेक्षण विभागाला दिले. ह्याच आदेशाला आव्हान देण्यासाठी आता उच्च न्यायालयात अर्ज दाखल झाला आहे.

 

अर्ज कर्त्यांचे म्हणणे आहे की न्या तिवारी हे स्वतःला कायद्याच्या वरचे समजत आहेत व त्यांनी दिलेला हा आदेश न्यायपालिकेच्या शिस्तीचा भंग करणाऱ्या आहे.  ह्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित थांबवावी अशी मागणी ह्या अर्जात करण्यात आली आहे.

 

#KashiVishvnath #Gyanvapi #AllahabadHighCourt #UttarPradesh

   

One thought on “काशी विश्वनाथ: पुरातत्व सर्वेक्षणाच्या निर्णयाविरोधात हाय कोर्टात अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!