निवृत्त न्यायाधीश सुरेंद्र यादव ह्यांची उत्तर प्रदेश राज्याच्या उप लोकायुक्त पदी नेमणूक करण्यात आली आहे. राज्याच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल ह्यांनी लोकायुक्तांच्या सल्ल्यावरून त्यांची नियुक्ती केली.
न्या. यादव ह्यांनी सहा महिन्यांपूर्वी बाबरी मशीद पडण्याच्या खटल्याचा निकाल दिला होता. हा खटला चालवून पूर्ण करण्यासाठी न्या यादव ह्यांना निवृत्तीनंतर वाढीव कालावधी देण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला होता. त्यानुसार त्यांच्या निवृत्तीपूर्व खटला ऐकून पूर्ण न झाल्याने त्यांनी वाढीव कालावधीत तो पूर्ण केला होता. ह्या खटल्यात त्यांनी आपल्या निकालाद्वारे सर्व आरोपींना दोषमुक्त केले होते.
शेकडो साक्षीदार आणि पुरावे तपासून झाल्यानंतर बाबरी मशीद पाडण्याचे कृत्य पूर्वनियोजित नव्हते ह्या निष्कर्षाला न्यायालय पोहोचले होते. तसेच आरोपींनी मशीद पडल्याचा कुठलाही प्रत्यक्ष पुरावा नसल्याचे स्पष्ट झाले होते त्यामुळेच न्या यादव ह्यांनी सर्व आरोपींना दोषमुक्त केले होते.
न्या. यादव आता उत्तर प्रदेश राज्याचे उप लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारतील.