पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ह्यांना निवडणूक आयोगाने २४ तासांसाठी प्रचार करण्यावर बंदीची शिक्षा सुनावली आहे.
ममता ह्यांनी बंगाल मधील विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान अल्पसंख्यांक धर्मियांना एकत्र येऊन मतदान करण्याचे आवाहन केले होते तसेच अशाच स्वरूपाची काही वक्तव्ये केली होती. निवडणूक आयोगाने ह्याबद्दल त्यांना शिक्षा सुनावली आहे.
ममता ह्यांची वक्तव्ये हा आचारसंहितेचा भंग असल्याचे तसेच भारतीय दंड संहिता आणि लोकप्रतिनिधी कायदा ह्याचाही भंग त्यांनी केल्याचे निवडणूक आयोगाने आपल्या निकालात स्पष्ट केले आहे.




ह्या निर्णयामुळे आता ममता ह्यांना १२ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून १३ एप्रिल रात्री ८ वाजेपर्यंत प्रचार करता येणार नाही