महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांना सीबीआय कडून चौकशी साठी बोलावण्यात आले आहे. त्यांच्या नावे सीबीआय कडून समन्स जरी करण्यात आले आहे.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंह ह्यांनी देशमुखांवर खंडणीखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. ह्या आरोपांची शहानिशा व्हावी ह्यासाठी स्वतंत्र चौकशीची मागणी करणारी याचिका त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. ह्या याचिकेवर निकालात मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला सादर प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
ह्या आदेशानुसार सीबीआय कडून चौकशीला सुरुवात झाली असून त्यांनी देशमुख ह्यांच्या स्वीय सचिव व सहाय्यकाची चौकशी केली आहे.
१४ एप्रिल रोजी अनिल देशमुख ह्यांना सीबीआय ने चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले आहे.
ह्या प्रकरणातील आमचे हे reports तुम्ही वाचले का?
अनिल देशमुखांची चौकशी होणार; ठाकरे सरकारकडून समिती स्थापन परमवीर सिंह V/S अनिल देशमुख: सीबीआय चौकशीचे न्यायालयाचे आदेश अनिल देशमुखांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली सीबीआय चौकशी साठी सहकार्य करण्याची माझी तयारी: सचिन वाझे
One thought on “अनिल देशमुख ह्यांना सीबीआय कडून समन्स”