गुढी पाडवा शोभायात्रांना परवानगी नाही: राज्य सरकारकडून निर्बंध जारी

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ह्या वर्षी देखील गुढी पाडवा साजरा करण्यावर राज्य सरकारकडून निर्बंध घालण्यात आले आहेत.

 

दर वर्षी गुढी पाडवा हा सण राज्यभरात मिरवणुका, शोभायात्रा काढून साजरा केला जातो. परंतु ह्या वर्षी राज्य शासनाने अशा मिरवणुका, प्रभात फेऱ्या काढण्यास मनाई केली आहे. तसेच ह्या सणानिमित्त कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यावर बंदी आहे.

  Maharashtra GR Gudi Padwa  

५ पेक्षा जास्त माणसांनी एका वेळी एका ठिकाणी जमू नये आणि गुढी पाडवा अत्यंत साधेपणाने साजरा करावा असेही महाराष्ट्र सरकारच्या आज जरी झालेल्या शासन निर्णयाद्वारे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!