कुराणातील काही भाग गाळण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली

मुस्लिमांचा धर्मग्रंथ कुराण शरीफ ह्यातील २६ वचनांचा भाग गळण्यात यावा अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकाकर्त्याला कोर्टाने ५०,००० रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे.

शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी ह्यांनी ही याचिका दाखल केली होती. कुराणातील २६ वचने त्यात नंतर नव्याने सामील करण्यात आली असून ती दहशतवादाला प्रोत्साहन देणारी आहेत असे रिझवी ह्यांचे म्हणणे होते.

 

न्या. नरिमन ह्यांच्या खंडपीठाने आज ह्या याचिकेवर सुनावणी घेतली. सुरुवातीलाच न्या. नरिमन ह्यांनी याचिकाकर्त्याला ते खरोखर गांभीर्याने ही याचिका सादर करत आहेत का असे विचारले. याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेतल्यावर कोर्टाने याचिका फेटाळून लावली.

 

ही याचिका अत्यंत निरर्थक असल्याचे मत ह्यावेळी कोर्टाने व्यक्त केले आणि याचिका कर्त्याला ५०,००० रुपये दंड लावत याचिका पुढे ऐकण्यास नकार दिला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!