रेमदेसिवीर निर्यातीवर केंद्राने घातली बंदी

केंद्र सरकारने रेमदेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. आज जरी केलेल्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे केंद्र सरकारने ही माहिती दिली.

 

देशात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने कारोना वरील उपचारांसाठी वापरत असलेल्या Remdesivir इंजेक्शन ची मागणी प्रचंड वाढली आहे. महाराष्ट्र व काही इतर राज्यांत Remdesivir चा तुटवडा निर्माण झाला आहे. ह्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे.

 

देशात ७ कंपन्या Remdesivir चे उत्पादन करतात. आजपासून Remdesivir Injection आणि Remdesivir Active Pharmaceutical Ingredients ह्यांची निर्यात करण्यास संपूर्ण बंदी असेल.

 

तसेच पुरेसा पुरवठा व्हावा ह्यासाठी सरकार उत्पादकांच्या संपर्कात आहे.

 

Remdesivir च्या सर्व देशांतर्गत उत्पादकांना त्यांच्या वेबसाईट वर त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या साठ्याची माहिती द्यावी लागेल तसेच त्यांच्या वितराकांविषयीही माहिती द्यावी लागेल. ह्यामुळे नागरिकांना Remdesivir इंजेक्शन मिळवणे सोपे जाईल.

One thought on “रेमदेसिवीर निर्यातीवर केंद्राने घातली बंदी

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!