भारताचे निवनियुक्त सरन्यायाधीश एन. व्ही. रामण्णा ह्यांनी आज ( रविवारी ) तिरुपती येथील श्री बालाजी मंदिरात दर्शन घेतले.
न्या. रामण्णा ह्यांची भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून नुकतीच नियुक्ती झाली. न्या. शरद बोबडे ह्यांच्या २३ एप्रिल ला होणाऱ्या निवृत्तीनंतर न्या. रामण्णा पदभार स्वीकारतील.

न्या. रामण्णा हे आंध्र प्रदेशात जन्म झालेले असून भगवान व्यंकटेशबालाजीचे भक्त आहेत. त्यांनी आपल्या पत्नीसह तिरुपती येथे जाऊन दर्शन घेतले. ते एक तास ह्या मंदिरात होते. तिरुपती तिरुमला देवस्थान ट्रस्ट तर्फे त्यांना पवित्र मलमली वस्त्र, भगवान बालाजीची प्रतिमा व प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले.
2 thoughts on “नवनियुक्त सरन्यायाधीश रामण्णा ह्यांनी घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन”