आंबेडकर जयंतीला ५ पेक्षा जास्त माणसे जमण्यास मनाई: राज्य सरकारचा निर्णय
 

महाराष्ट्र शासनाने १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या पूज्य बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नियमावली जाहीर केली आहे.

 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आंबेडकर जयंती साजरी करण्यावर अनेक कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत.

 

राज्य सरकारच्या GR नुसार ह्या दिवशी मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त ५ व्यक्तींच्या उपस्थितीत बाबासाहेबांचे प्रतिमापूजन किंवा पुतळ्याला अभिवादन करता येईल. त्यापेक्षा अधिक माणसे जमन्यास मनाई असेल.

 

तसेच बाबासाहेबांच्या अनुयायांनी दादर येथील चैत्यभूमीला यावर्षी येऊ नये असेही ह्या शासन निर्णयात निर्देश आहेत.

 

मा. मुख्यमंत्री ह्यांच्या चैत्यभूमी येथील मानवंदना कार्यक्रमाला ५० व्यक्ती उपस्थित राहू शकणार आहेत.

  Ambedkar jayanti  

आरोग्य विषयक उपक्रम, शिबिरे करण्यास परवानगी असेल. त्यासाठी उपस्थितीची मर्यादा नाही परंतु सोशल डिस्टंसिंग पाळण्याचे निर्देश आहेत.

यापुढे आणखी काही नियम लागू केल्यास त्याचेही पालन करण्याचे सर्वांना आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!